शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

निर्यात अनुदान वजा करून एफआरपी देणार- कारखानदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:51 PM

केंद्र सरकारकडून मिळणारे निर्यात, बफर स्टॉक व वाहतूक अनुदान वजा करता, उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. सरासरी प्रतिटन २५० रुपये

ठळक मुद्देप्रतिटन २५० रुपयांसाठी वाट पाहावयास लागणार

कोल्हापूर : केंद्र सरकारकडून मिळणारे निर्यात, बफर स्टॉक व वाहतूक अनुदान वजा करता, उर्वरित एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय साखर कारखानदारांनी घेतला. सरासरी प्रतिटन २५० रुपये वजा जाता, शेतकºयांच्या खात्यावर पैशाच्या उपलब्धतेनुसार जमा केले जाणार आहे.

एकरकमी एफआरपी, साखर आयुक्तांनी केलेली कारवाई आणि केंद्र सरकारने साखरेच्या किमान हमीभावात केलेली वाढ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक जिल्हा बॅँकेत झाली. यामध्ये केंद्र सरकारच्या साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉकवरील व्याज आणि वाहतूक खर्चापोटी मिळणारे अनुदान यावर चर्चा झाली. साखर निर्यात करणाºया कारखान्यांना उसाला प्रतिटन १३८.८० रुपये अनुदान केंद्र सरकार देणार आहे. त्याचबरोबर साखरेचा बफर स्टॉक केल्यास व्याजापोटी १२ टक्के प्रमाणे कारखान्यांना पैसे दिले जाणार आहेत. त्याचबरोबर निर्यात साखरेच्या वाहतुकीसाठी अनुदान मिळणार आहे.

साधारणत: कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास प्रतिटन २०० ते ३२५ रुपयांपर्यंत ही रक्कम होते. सरासरी २५० रुपये होत असून, याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव कारखान्यांनी पाठविला आहे. हे पैसे मिळाल्यानंतर शेतकºयांना द्यायचे, तोपर्यंत उर्वरित एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.एफआरपी जाहीर केल्याचे पडसाद

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यानंतर ‘पंचगंगा’, ‘शरद’ व ‘जवाहर’ साखर कारखान्याने एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा केल्याने इतर कारखान्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्याचे पडसाद शुक्रवारच्या कारखानदारांच्या बैठकीत उमटले. संबंधित कारखानदारांना जाब विचारल्याचे समजते.कारखानदारांनी आडमुठीपणा सोडावा : शेट्टीसाखर निर्यातीसह इतर अनुदान केंद्र सरकारकडून शेतकºयांच्या खात्यावर वर्ग होणार नाही, तर ते कारखान्यांकडेच जमा होणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी आडमुठे धोरण न राबविता शेतकºयांना संपूर्ण एफआरपीची रक्कम द्यावी, अन्यथा आम्हाला आमच्या मार्गाने जावे लागेल, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने