ओळी - नांद्रे गावासाठी रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळावेत, यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदार जयंत आसगावकर यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नांद्रे आरोग्य उपकेंद्रासाठी रुग्णवाहिकेसह सांगली विधानसभा मतदार संघातील १२ गावांना स्थानिक विकास निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स देण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आमदार जयंत आसगावकर यांच्याकडे केली आहे. पाटील म्हणाले की, नांद्रे आरोग्य उपकेंद्रांतर्गत मौजे डिग्रज, कर्नाळ, पद्माळे, हरिपूर, माधवनगर, खोतवाडी, वाजेगाव व नांद्रे अशी गावे येतात. कोरोना महामारीच्या काळामध्ये येथील रूग्णांची रूग्णवाहिकेअभावी गैरसोय होत आहे. तेथे रूग्णवाहिकेची तातडीने आवश्यकता आहे. तसेच स्थानिक विकास निधीतून माधवनगर, बुधगाव, बिसूर, बामनोली, कावजी खोतवाडी, नांद्रे, कर्नाळ, पद्माळे, हरिपूर, अंकली, इनाम धामणी, जुनी धामणी यांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी खोतवाडीचे सरपंच संजय सूर्यवंशी, नांद्रेचे उपसरपंच नेमगोंडा पाटील, माजी उपसरपंच सुहास पाटील, महावीर पाटील, गणेश घोरपडे, महावीर नांद्रेकर, प्रसाद पाटील, आदी उपस्थित होते.