फोटो ओळ : भिलवडी (ता. पलूस) येथे मंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सविता महिंद, पृथ्वीराज पाटील, महेंद्र लाड, संग्राम पाटील, बाळासाहेब मोहिते, बी. डी. पाटील आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : डॉ. पतंगराव कदम यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांना प्रगती साधायची आहे. तुम्ही कामे सुचवा आम्ही ती पूर्णत्वास नेऊ. भिलवडी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.
भिलवडी (ता. पलूस) येथे विविध विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते भिलवडी येथील स्वामी समर्थ सेवा केंद्र, लक्ष्मी मंदिर व संभाजीअण्णा मंदिर परिसरातील विकासकामांचा प्रारंभ झाला. तसेच ‘माझी माय कृष्णा’ या मोहिमेचाही प्रारंभ बांबूचे रोप लावून करण्यात आला.
सरपंच सविता पाटील व उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. दिव्यांगांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी महेंद्र लाड, आनंदराव मोहिते, संग्राम पाटील, उद्योजक गिरीश चितळे, मकरंद चितळे, चंद्रकांत पाटील, शहाजी गुरव, बाळासाहेब मोहिते, बी. डी. पाटील, विलास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दीपक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.