आळसंद व परिसरातून बामणी येथील उदगीर शुगर व कार्वे, मंगरूळ परिसरातून आळसंद येथील विराज शुगर तसेच पलूस-कडेगाव तालुक्यातील क्रांती व सोनहिरा कारखान्यांना मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक होत असते. खानापूर व तासगाव तालुक्यांतील प्रवाशांना हा मार्ग सोयीचा आहे. कमळापूर ते आळसंद व कार्वे ते हातनोलीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आळसंद ते कार्वे या गावांना जोडणारा सहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. अद्यापही डांबरीकरण झाले नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे तसेच आळसंद येथील मुख्य ओढ्यावरील जुने पूल निकामी झालेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विटामार्गे १२ किलोमीटर लांबून वाहतूक करावी लागत आहे तरी हा रस्ता व पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नितीन जाधव, उपसरपंच विक्रम पाटील, बाबासाहेब जाधव, भरत हारुगडे, भरत जाधव, धनाजी जाधव उपस्थित होते.