शिरढोण : धुळगाव येथील विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार सुमनताई पाटील यांनी दिली.
धुळगाव (ता.कवठेमहांकाळ) येेथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, अग्रणी धुळगाव येथील विकासकामे मंजूर व्हावीत, तसेच विकासकामांना निधी मिळावा, यासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. गावांच्या विकासासाठी कार्यकर्त्यांनी कायम पाठपुरावा करणे गरजेचे आहे. गावातील विकासकामांना सुमारे दोन कोटी ११ लाख रुपयांचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
अग्रणी धुळगावचा विकास यापूर्वी रखडला होता, परंतु आर.आर. पाटील हे आमदार झाल्यानंतर येथील विकासकामांना मोठा निधी दिला. त्यामुळे हे गाव आबांचे उपकार कधीही विसरणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे नेते सम्राट भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी अनिता सगरे, विकास हाक्के, टी.व्ही. पाटील, नीलमताई पवार, आशाताई पाटील, दत्ताजीराव पाटील, सुरेखा कोळेकर, एम.के. पाटील, मीनाक्षी माने आदी उपस्थित होते.
260921\128-img-20210926-wa0004.jpg
फोटो ओळी - अग्रणी धुळगांव येथील अग्रणी नदीवरील पुलाच्या कामाचा शुभारंभ करताना आमदार सुमनताई पाटील आदी )