सांगली : जिल्ह्यात सुरू असलेला जुगार व बेकायदा दारूविक्रीवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील विविध भागांत कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी जुगार प्रकरणात जिल्हाभर कारवाई केली. यात संतोष तेवरे (सांगली), दिलीप कांबळे (दुधगाव ), समीर सिकंदर पठाण (खणभाग), महमदजुवेद सिकंदर दर्यावर्दी (मिरज), शहारूख ककमरी (शास्त्री चौक, मिरज), इसाक पिरजादे, मारुती पाटील (बुर्ली, पलूस), परशुराम शिरतोडे (भिलवडी), राहुल कवडे (विटा), दिलीप मोहिते (देवराष्ट्रे), विजय रामचंद्र कदम (आटपाडी), संतोष खोत (कासेगाव, वाळवा), रघुनाथ बेडगे (कोकळे, कवठेमहांकाळ), बसवराज रामगोंडा अजनाळकर (उमदी, जत), सल्लेश सिदाप्पा कोळ (जत), सायबाण्णा बिराजदार (बोर्गी, जत) अशी कारवाई झालेल्या संशयितांची नावे आहेत.
बेकायदा दारू विक्रीप्रकरणातही कारवाई करण्यात आली यात आकाश दिलीप सादरे (नांद्रे), जावेद मुबारक मुजावर (कवठेपिरान), संजय भास्कर कांबळे (गोकुळनगर, सांगली), विक्रम आप्पासाहेब धडस (सिद्धेवाडी, मिरज), गौतम राऊ सूर्यगंध ( रेठरेहरणाक्ष, वाळवा), तानाजी रामचंद्र जाधव ( चिकुर्डे, वाळवा), दिलीप बापू घनवट (कुरळप), बापूसाहेब बयाजी उत्तरे (कारंदवाडी), राजेंद्र गोविंद मराठे (मराठेवाडी, शिराळा), वामन कृष्णा गोसावी (शिराळा), पृथ्वीराज मारुती पाटील (विसापूर), भानुदास माने (आंधळी), विष्णू घोलप (कुंडल), सोमनाथ मच्छिंद्र मदने (लिंगीवरे, आटपाडी), चंद्रकांत वायदंडे (हिंगणगाव खुर्द, कडेगाव), शिवाजी मलमे (कोंगनोळी, कवठेमहांकाळ), रंगनाथ साबू इळगीर (जत), संदीप गडदे (वाषाण, जत), संजय नाईक (अंकले, जत) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.