पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी पाटील यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. १ नोव्हेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत सांगली व मुंबई येथे हे व्यवहार झाले. त्यानुसार संशयितांची असलेल्या फुडस्टाफ ट्रेडिंग एलएलसी कंपनीकडून पाटील यांना विश्वास देत ७ कंटेनर ज्याची भारतीय रुपयांमध्ये १ कोटी ५७ लाख रुपये किंमत होते. इतका माल खरेदी केला होता. यापूर्वी ठरल्याप्रमाणेच मालाची रक्कम न देता संशयितांनी पाटील यांना ७६ हजार ६३५ अमेरिकन डॉलरचा खोटा बँक ट्रान्सफर ॲडव्हाईस मेल पाठविला होता. या प्रकारानंतरही त्यांनी रक्कम मिळविण्यासाठी प्रयत्न केले मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार संशयितांनी संगनमत करत व पाटील यांना विश्वासात घेऊन एक काेटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत.
सांगलीतील व्यापाऱ्यास दीड कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:24 AM