सांगली : जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य नदीत फेकू नये, या डॉल्फिन नेचर ग्रुप या संस्थेने केलेल्या आवाहनास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या, सातव्या आणि नवव्यादिवशी विसर्जनावेळी १३ टन निर्माल्य संकलन झाले. या निर्माल्यापासून आमराई व महावीर उद्यानात सेंद्रीय खताची निर्मित्ती केली जाणार आहे.
यावर्षी पाचव्यादिवशी चार, सातव्यादिवशी सहा, तर शुक्रवारी नवव्यादिवशी तीन टन निर्माल्य संकलन केले. संस्थेचे दिनेश पाटील, प्रविण मगदुम, संस्थापक प्रा. शशिकांत ऐनापुरे, कार्याध्यक्ष अरूण कांबळे, सचिन चोपडे, आदिती कुंभोजकर, प्रा. डॉ. विकास आवळे, लक्ष्मण भट, पवन भोकरे, मधुरा सवदी, विजय सवदी, रफीक इनामदार आदी सदस्य या कार्यात सहभागी झाले होते.
गणेश भक्तांकडून या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश भक्तांनी प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदामधून निर्माल्य आणून डॉल्फिनच्या सदस्यांकडे सुपूर्द केले. सृजन सांगली संस्थे गणेश खटके, मदन पाटील, मानसिंग पवार, सचिन खुरपे हेही या कार्यात सहभागी झाले होते.प्रत्येकवर्षी खतगणेश भक्तांकडून जमा झालेले १३ टन निर्माल्य आमराई व महावीर उद्यानात ठेवण्यात आले आहे. यापासून सेंद्रीय व गांढूळ खताची निर्माती केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी निर्माल्यापासून खत तयार केले जाते. हे खत उद्यानातील वृक्षांना अत्यंत उपयुक्त ठरते.