अमोल माने यांचे वडील विठ्ठल माने हे जम्मू-काश्मीर येथून मिरजेत पत्नीला चार लाख ९९ हजार ९९५ इतकी रक्कम पाठवत होते. परंतु ही रक्कम ट्रान्सफर होत नसल्याने विठ्ठल माने यांनी बॅंकेच्या कस्टमर केअरच्या दूरध्वनी क्रमांकाचा शोध घेतला. मात्र त्यांना चुकीचा क्रमांक मिळाला. दोन क्रमांकावर विठ्ठल माने यांनी फोन लावल्यानंतर फोन कट झाला. त्या क्रमांकावरून विठ्ठल माने यांना पुन्हा फोन आला. त्यावेळी फोनवर बोलणार्या भामट्याने माने यांना त्यांच्या पत्नीस ऑटोमॅटिक फॉरवर्ड एसएमएस ते युवर पीसी फोन आणि क्विक सपोर्ट असे दोन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. ॲप डाऊनलोड केल्यानंतर माने यांनी रक्कम ट्रान्सफर करताना बँकेचा ओटीपी क्रमांक माने यांच्या पत्नीच्या मोबाइलवरून भामट्याला मिळाला. या ओटीपीचा वापर करून माने यांच्या खात्यात जमा होण्याऐवजी अज्ञाताच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करण्यात आली. परस्पर रक्कम काढून घेऊन चार लाख ९९ हजार ९९५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचा मुलगा अमोल माने याने अज्ञाताविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
मिरजेतील एकास पाच लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:27 AM