गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथील मुख्य शिवाजी चौकातील बसस्थानक चौकात कचरा अस्ताव्यस्त पसरला गेला आहे. ग्रामपंचायतीकडून कचरा उचलला न गेल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी तत्काळ कचरा उचलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बसस्थानक परिसरातील व्यावसाईक व इतर लोकांकडून रस्त्याच्या बाजूलाच कचरा टाकला जातो. तो ग्रामपंचायतीकडून उचलला जात होता; परंतु अलीकडे ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष आहे. भटकी कुत्री व वाहनांच्या रहदारीमुळे कचरा अस्ताव्यस्त होत आहे. स्टँड परिसरातच बावची प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तेथील रुग्णांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्रामपंचायतकडून तेथील कचरा तत्काळ उचलून तो परिसर नेहमी स्वच्छ राहावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
फोटो-०९गोटखिंडी१
फोटो : बावची (ता. वाळवा) येथील बसस्थानक परिसरातील कचरा अस्ताव्यस्त फेकला गेल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.