आरग येथे महिलांसाठी परसबागेची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : रासायनिक खतांचा वापर कमी करत महिलांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन झलकारी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शशिकला गावडे यांनी केले. आरग येथे परसबाग प्रात्यक्षिकामध्ये मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेंतर्गत पंचायत समितीतर्फे महिलांच्या स्वयंसहाय्यता समूहाकडून परसबाग लागवड करून घेतली जात आहे. त्यासाठी झलकारी ग्रामसंघातर्फे परसबागेचे प्रात्यक्षिक झाले. संस्थेच्या अध्यक्ष अधिका बाबर यांच्या शेतीत परसबागेचे गादीवाफे बनवून बियाण्यांची लागवड करण्यात आली. यावेळी शिवशक्ती, हिरकणी, संविधान, सृष्टी, सरस्वती, समर्थ या स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला उपस्थित होत्या. रेश्मा सातपुते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेखा खटावे, अश्विनी पाटील, सारिका कवाळे, उज्ज्वला नीळकंठ, लता कांबळे, शीतल कांबळे, वीना सारवाडे, मधुमती आवळे, आदी उपस्थित होते.