शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
3
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
4
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
5
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
6
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
7
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
8
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
9
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
10
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
11
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
12
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
13
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
14
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
15
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
16
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

लसणाचे भाव झपाट्याने वाढले, नवी आवक घटली; सततच्या पावसाचा परिणाम

By संतोष भिसे | Published: September 10, 2024 12:31 PM

संतोष भिसे सांगली : सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा ...

संतोष भिसेसांगली : सुमारे वर्षभरापूर्वी ४०० ते ५०० रुपये किलोवर जाऊन सर्वसामान्यांना घाम फोडणाऱ्या लसणाने आता पुन्हा एकदा दरवाढीची मोठी झेप घेतली आहे. सध्याच्या ऐन सणासुदीच्या दिवसांत तो ४०० रुपये किलोवर जाऊन पोहोचला आहे. १०० रुपयांत अवघा पाव किलो लसूण खरेदी करताना गृहिणींचे बजेट ढासळू लागले आहे.तीन-चार महिन्यांपूर्वीपर्यंत गल्लोगल्ली फिरुन ५० रुपये किलो दराने लसूण विकणारे विक्रेते आता दिसेनासे झाले आहेत. दरवाढीने त्यांनाही किरकोळ विक्री परवडत नसल्याचे सांगत आहेत. सध्याचा किरकोळ बाजारातील भाव आणखी वाढून ६०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. जुन्या लसणाची आवक संपली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने ठिय्या मारल्याने नवा लसूण बाजारात आलेला नाही. त्यामुळे उपलब्ध बाजारात लसणाचे भाव झपाट्याने वाढले आहेत.व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावर्षी संपूर्ण देशभरातच लसणाचे उत्पादन खालावले आहे. मे महिन्यापासूनच पावसाने जोर धरल्याने नवी लावण लांबली किंवा कमी झाली. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला. सांगलीच्या घाऊक बाजारपेठेत चांगल्या दर्जाचा लसूण ३०० रुपये किलो दराने मिळत आहे.सामान्यत: जानेवारी ते मे दरम्यान नवीन लसणाचे उत्पादन होते. पण यंदा त्याचा साठा लवकरच संपला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातून येणारा लसूणही घटला आहे.

दिवाळीपर्यंत वाट पहानवा लसूण बाजारात येण्यास नोव्हेंबर उजाडू शकतो, त्यानंतरच दर कमी होण्याची शक्यता आहे. याच काळात महाराष्ट्रात सणांची धांदल सुरु असते. त्यामुळे मागणी तेजीत राहून दरदेखील कडक राहू शकतात.

मे महिन्यात लसूण १०० रुपये किलो दराने विकला. दर कमी होण्याच्या भीतीने सगळाच माल संपवला. आता दर वाढले, पण घरात लसूण शिल्लक नाही. - बाळासाहेब पाटील, उत्पादक शेतकरी, आरग. 

लसणाचे दर आणखी वाढू शकतात. नवा माल बाजारात आलेला नाही. शेतकऱ्यांकडेसुद्धा शिल्लक नाही. सततच्या पावसाने हा परिणाम झाला आहे. - निसार देसाई, व्यावसायिक

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस