शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

गॅस वितरकाकडून ग्रामस्थांना दमदाटी

By admin | Published: July 14, 2014 12:19 AM

येळावीतील प्रकार

येळावी : पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथील भारत गॅस वितरणच्या मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येळावीसह परिसरातील नागरिकांना गॅस पुरवठाही अनियमित केला जात असून, गॅसधारकांना उद्धट उत्तरे दिली जात आहेत. किर्लोस्करवाडी येथील कुलकर्णी बंधू हे तालुक्यातील एकमेव वितरक आहेत. येळावी, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस, मोराळे, आंधळी, कुंडल व परिसरामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत. नागरिकांना वेळेवर सिलिंडर पुरवठा केला जात नाही. ग्राहकांची नेहमीच बोळवण केली जात आहे. याबाबत विचारणा केल्यास कुलकर्णी बंधूंकडून दमदाटी करण्याचे प्रकार रोज सुरू आहेत. याबाबत तहसीलदार कार्यालयातून योग्य न्याय मिळत नसल्याची येथील ग्राहकांची तक्रार आहे. याबाबत या गॅस वितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता, तुम्ही ज्या गावचे आहात, त्याच गावात आमची गाडी आल्यानंतर सिलिंडर उपलब्ध होईल अन्यथा आमच्या कार्यालय वा इतर ठिकाणी तुम्हाला पुरवठा केला जाणार नाही, असे सांगण्यात आले. (वार्ताहर) बेसुमार वाळू उपशाने जॅकवेलला धोकाअंकलखोपमधील प्रकार : ग्रामस्थांची तक्रारअंकलखोप : अंकलखोप (ता. पलूस) येथील ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा जॅकवेलसमोरच वाळू उपसा सुरू असल्याने जॅकवेलला धोका निर्माण झाला आहे. तसेच बोटीच्या इंजिनचे डिझेल पाण्यावर पसरून पाणी दूषित होत आहे. हे तात्काळ थांबवावे, अशी मागणी सरपंच सौ. श्वेता बिरनाळे, उपसरपंच सतीश सूर्यवंशी व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन पलूस तहसीलदार, जिल्हाधिकारी, पलूस पोलीस ठाणे यांना देऊन सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषणास बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.भिलवडीच्या बाजूला ठेका असतानाही दोन बोटीद्वारे अंकलखोपच्या बाजूलाही वाळू उपसा केला जातो. अंकलखोप व परिसरातला दूषित पाणी पुरवठ्यामुळे साथीचे आजार होण्याचा धोका आहे. जॅकवेलपासून केवळ २०० ते २५० फुटावर बोटीद्वारे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)