शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

सांगलीत गव्यांचा ठाण, शिराळा परिसरात चार गव्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 1:46 PM

बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिराळा : शिराळा शहरा नजीक असणाऱ्या गोरक्षनाथ मंदिर, कापरी, जांभळेवाडी दरम्यान आज सकाळच्या सुमारास चार गव्यांचा वावर आढळून आला. याच परिसरात बिबट्याचाही वावर आहे. काही महिन्यांपूर्वी दुचाकीवरील नागरिकावर बिबट्याने हल्ला केला होता.

दरम्यान बिऊर , भाटशिरगाव , पावलेवाडी आदी परिसरातही ८ गव्यांचा कळप आढळून आला. मानवी वस्तीत वाढत असलेल्या बिबट्या व गव्यांच्या वावरामुळे नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे. त्यामुळे बाहेर कोरोना अन् शेतात गव्याची भीती अशी अवस्था झाल्याने शेतांच्या कामात व्यत्यय येत आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये प्राण्यांना खाद्य मिळत नसलेने त्यांचा मानवीवस्तीत वावर वाढला आहे. बिबटे, माकडं, वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचा हल्ला झालेला असतो. माकडं व वानरे पिकांचे नुकसान करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी मणदूर येथील संतू पाटील यांना गव्याने जखमी केले होते. देववाडी, खेड फाटा, शिराळा बस स्थानक, चिखलवाडी, पवारवाडी, शिंगटेवाडी आदी परिसरात दि.२९ व ३० एप्रिल २०२० रोजी  रात्री गव्याचे दर्शन झाले होते. हा गव्याने डांगे गल्ली, पवळ गल्लीतून गेला व  याठिकाणी मक्याच्या पिकाचे नुकसान केले होते. वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तसीलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी या परीसराची पाहणी केली.

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळा