सांगली : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सभागृहातच घेण्याला अखेर मान्यता मिळाली आहे. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी सभा होणार असल्याची माहिती अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे यापूर्वीच्या तीन सभा ऑनलाईन स्वरूपात घ्याव्या लागल्या होत्या. त्याला सदस्यांनी तीव्र विरोध केला होता. गेल्या वेळची सभा तर कोणतीही निर्णायक चर्चा न होताच पार पडली होती. पंचायत समित्यांच्या सभा व प्रशासकीय बैठका ऑफलाईन होतात, तर जिल्हा परिषदेची सभा ऑनलाईन कशासाठी, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता. महत्त्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सभागृहात सभा टाळली जात असल्याचा आरोप केला होता.
सध्या जिल्ह्याची कोरोनास्थिती तुलनेने गंभीर नाही. स्तरही सुधारला आहे. त्यामुळे आगामी सभा ऑफलाईन स्वरूपात घेण्यास मंजुरी मिळाल्याचे कोरे म्हणाल्या.