लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा परिषदेत वर्ग १ आणि वर्ग २ च्या अधिकाऱ्यांची वानवा भासत आहे. महत्त्वाच्या रिक्त पदांचा भार विशिष्ट अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकास कामांना खीळ बसली आहे. वैद्यकीय, पशुवैद्यकीय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांसह अन्य १४० पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेत कृषी, आरोग्य, सामान्य प्रशासन, महिला, बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण, आरोग्य आदी विभाग आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून शासनाने जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी केले आहे. शासकीय योजना राबविणारी ‘एजन्सी’ म्हणून याकडे पाहिले जाते. शासनाकडून मिळणाऱ्या निधीत ७५ टक्के कपात केली असून ग्रामपंचायतींचा निधी वाढविला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद चालविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्याबळाकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी अनेक कामे रखडली आहेत. जिल्हा परिषदेत वर्ग १ ची ३३ पैकी २९ पदे भरलेली असून ४ पदे रिक्त, तर वर्ग २ मध्ये १८७ पदे भरली असून १३७ पदे रिक्त आहेत. वर्ग एक आणि वर्ग दोनच्या १४१ पदांचा अनुशेष कायम आहे. आता तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचेही पद रिक्त आहे. याशिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, समाजकल्याण, कृषी अधिकारी, माध्यमिक व प्राथमिकचे चार उपशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाची पदे भरलेली नाहीत. पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, पशुवैद्यकीय, बाल विकास प्रकल्प, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असूनही ती भरण्याच्यादृष्टीने खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. रिक्त पदे कधी भरली जाणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची रिक्त पदेविभागमंजूर पदेरिक्त सहा. गटविकास अधिकारी११७उपअभियंता२८१५वैद्यकीय अधिकारी गट-अ११९२१वैद्यकीय अधिकारी गट-ब१८७प्रशासन अधिकारी११जिल्हा माध्यम अधिकारी११पशुधन विकास अधिकारी गट-अ८५४८जिल्हा कृषी अधिकारी११उपशिक्षणाधिकारी प्राथमिक२१गटशिक्षणाधिकारी१०४उपशिक्षणाधिकारी माध्यमिक४३बालविकास प्रकल्प अधिकारी१३१२सहा. प्रकल्प अधिकारी२२कार्यकारी अभियंता११समाजकल्याण अधिकारी११निरंतर शिक्षणाधिकारी११एकूण२९८१२६गटशिक्षणाधिकारी : चार पदे रिक्तमिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी येथे गटशिक्षणाधिकारीच नाही. ही पदे गेल्या सहा महिन्यांपासून भरली नाहीत. त्यातच कडेगावचे गटशिक्षणाधिकारीही ३१ मेरोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तीन उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदेही दोन वर्षापासून रिक्त आहेत.
रिक्त पदांमुळे कामांना खीळ
By admin | Published: May 09, 2017 11:41 PM