शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घ्या - वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 6:51 PM

सांगलीत महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलन

सांगली : बदललेली नैसर्गिक रचना आणि पशू, पक्ष्यांच्या अधिवासातही वारंवार बदल होत असल्याने वन्यजीव अभ्यासकांना आव्हान निर्माण होत आहे. वृक्षतोड वाढल्याने निसर्गाची साखळीही तुटत आहे. त्यामुळे परदेशात पन्नास - साठ वर्षांपासूनच निसर्ग संवधर्नाची हाक दिली जात आहे. आपल्यात अद्याप त्यावर तितकी कार्यवाही होत नाही. तरीही वन्यजीव अभ्यासकांनी नाउमेद न होता पक्षी, वनांचे भावविश्व जाणून घेण्यासाठी निसर्गाशी एकरूप झाल्यास काम अधिक प्रभावी होईल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय किर्तीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी रविवारी सांगलीत केले. सांगलीत झालेल्या ३६व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनात ‘पिसे आणि पसारा’ या विषयावर ते बोलत होते.पाटील म्हणाले की, आपल्याला नेहमीच परदेशी लोकांचे आणि त्यांच्या वन्यजीव अभ्यासाचे आकर्षण असते. मात्र, आपल्या देशातील निसर्गसंपदाही समृध्द असल्याने त्याचा अभ्यासासाठी उपयोग व्हायला हवा. त्यामुळे पक्ष्यांचे भावविश्व समजून घेण्यासाठी पुस्तकी ज्ञान घेण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गात जाऊन त्याचा अभ्यास करायला हवा.पक्षीनिरीक्षणातील फोटोग्राफी हा महत्त्वाचा भाग असतो. गेला आणि फोटा काढला, असे कधीच होत नाही. त्यासाठी सर्वांत पहिल्यांदा त्या पक्ष्यासोबत आपली ओळख होणे आवश्यक असते. यासह निसर्गातील प्रत्येक घटक जेव्हा आपला सरावाचा होतो तेव्हाच चांगले फोटो घेता येऊ शकतात. अनेकदा एका चांगल्या निसर्ग फोटोसाठी दोन दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. सध्या मात्र, पक्षी आणि वनांचे भावविश्व जाणूनही घेण्याची तसदी नसलेले यासाठी पुढे येतात आणि त्यांची निराशा होते.आपण निसर्गाचे देणे लागतो, त्यामुळे या निसर्गातील ते क्षण टिपण्यासाठी तेवढाच संयम आपल्यातही असायला हवा, असेही पाटील म्हणाले.

पाटील यांच्या फोटोग्राफी टीप्स

  • निसर्ग फोटो शक्यतो सकाळी ६:०० ते ७:०० आणि सायंकाळी ६:०० पर्यंत करा.
  • ट्रायपॉडचा वापर आवश्य करा.
  • पक्ष्यांच्या फोटोसाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम कालावधी आहे.
  • नैसर्गिक रंगसंपदेचा अभ्यास करूनच अँगल निवडा.
  • पक्ष्यांची कृती आणि वर्तन यातील फोटो अधिक प्रभावी असतात.
टॅग्स :Sangliसांगली