गझलकार सुरेश भट यांच्या स्मृती दिनी अभिवादन कार्यक्रमासाठी प्रा. भीमराव धुळूबुळू, वैभव चौगुले, समाधान शिंदे आदी उपस्थित होेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गझलेचा वाङमयीन प्रकार जनमाणसांत रुजविणारे सुरेश भट म्हणजे साहित्य समृद्ध करणारा महामानव होते असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी केले. सुरेश भट यांच्या स्मृती दिनी त्यांच्या गझलांच्या सादरीकरणाने अभिवादन करण्यात आले. शब्दवैभव साहित्य समूहाने कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रमुख पाहुणे म्हणून समाधान शिंदे उपस्थित होते. यावेळी प्रा. धुळूबुळू यांनी सुरेश भटांच्या सहवासातील अनेक आठवणी सांगितल्या.
वैभव चौगुले यांनी स्वागत केले. धनदत्त बोरगावे, अस्मिता इनामदार, सुधा पाटील, शांता वडेर, गौतम कांबळे, मुबारक उमराणी, नाईकबा गिड्डे, संदीप पवार, अविनाश सगरे, त्रिशला शहा, सायली चौगुले आदी कवींनी रचना सादर केल्या. मनिषा रायजादे -पाटील यांनी सूत्रसंचलन केले. कवी राहुल पाटील यांनी आभार मानले. सहभागी झालेल्या सर्वांना सुधा पाटील यांच्या रेड डॉट व घुसमट, आणि परिभाषा प्रेमाची ही पुस्तके भेट देण्यात आली. संयोजन वैभव चौगुले यांनी केले.