आष्टा येथे आधार वृद्धाश्रमातीतील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आली. यावेळी ज्ञानदेव पवार, महादेव कारंडे, मारुती पारळे, गणपत पाटील, रामचंद्र पवार, अस्मिता देशमुख, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : येथील श्री राम सीता सेवाभावी संस्थेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपाध्यक्ष गणपत पाटील यांनी आधार वृद्धाश्रम येथील वृद्धांना जीवनावश्यक साहित्य भेट दिले.
ज्ञानदेव पवार म्हणाले, आष्टा शहरातील विविध जाती धर्माच्या वृद्धांना आधार वृद्धाश्रम येथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना कोरोना संकटात आधार देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. म्हणून आमच्या संस्थेने पहिले पाऊल टाकले आहे.
यावेळी नवजीवन शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कारंडे, मारुती पारळे, रामचंद्र पवार, सर्जेराव देशमुख, आदी उपस्थित होते. यावेळी वृद्धाश्रमाच्या संचालिका अस्मिता देशमुख यांनी आभार मानले.