ते म्हणाले, वीज बिल माफीचा प्रश्न लोंबकळत असून, सरकार राजकीय टीकाटिप्पणीत गुंतले आहे. जनता मात्र कोविड काळात जाहीर केलेल्या वीज बिल माफीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकमधील शेतकऱ्यांना शंभर टक्के मोफत वीज दिली जात आहे. येथे राज्य सरकारकडून एकाही शेतकऱ्याला एक रुपये वीज बिलाची सवलत मिळालेली नाही. वीज पुरेशा प्रमाणात मिळत नसतानाही शेतकरी वीज बिल भरत होता. पण, सध्या शेतकरी नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहे. कोरोना कालावधीत, तर दोन महिने शेतीमालाला दर मिळाला नसल्यामुळे त्याचे ढीग रस्त्यालाच मारले होते. या शेतकऱ्यांना शासनाने शंभर टक्के वीज सवलत तत्काळ देण्याची गरज आहे. शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा राज्यभर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे.
कृषी पंपाला शंभर टक्के वीज मोफत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:19 AM