शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

कारखान्यांना प्रतिटन ७०० रुपये अनुदान द्या: सांगलीत कारखानदारांची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:02 AM

साखर दरातील प्रचंड घसरणीमुळे जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपये आणि केंद्राने

ठळक मुद्देनिर्यातीसाठी प्रति क्विंटल साखरेला १५० रुपये अनुदान द्यावे

सांगली : साखर दरातील प्रचंड घसरणीमुळे जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत सापडले आहेत. कारखान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ऊस गाळपाला प्रतिटन ७०० रुपये आणि केंद्राने निर्यातीसाठीच्या अनुदानात वाढ करून प्रति क्विंटलला १५० रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करण्याचा निर्णय साखर कारखाना अध्यक्ष, प्रतिनिधींच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

दरम्यान, साखर उद्योगातील अडचणी वाढत चालल्याने सर्वच साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आहेत. यामुळे जिल्हा बँकही अडचणीत येण्याची भीती असून रिझर्व्ह बँकेने एनपीए धोरण बदलण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रियाही यावेळी प्रतिनिधींनी व्यक्त केली.

साखर कारखान्यांच्या अडचणी व पर्यायाने त्यामुळे जिल्हा बँकेसमोर निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेत बैठक झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गाळप हंगाम सुरु करण्यासाठी प्रत्येक कारखान्यांना १५ कोटी कर्ज आवश्यक आहे. परंतु, शॉर्ट मार्जिनमुळे कर्जच देता येत नाही, अशी स्थिती आहे. तसेच कारखान्यांची थकीत कर्जे एनपीएत न धरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. या संकटातून बाहेर येण्यासाठी साखर कारखान्यांना प्रतिटन ७०० रूपये अनुदान देण्यात यावे व निर्यातीचे ५५ रूपयांचे अनुदान वाढवून ते १५० रूपये करावे, अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.यावेळी आ. मोहनराव कदम, ‘महांकाली’च्या अध्यक्षा अनिता सगरे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी संचालक प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग, सूर्यकांत पाटील, शरद कदम, जयकर पाटील, मृत्युंजय शिंदे, मनोज सगरे, एन. एम. मोटे, कालिदास थोरात, एस. एम. वामने आदी उपस्थित होते.देशात विक्रमी साखरेचे उत्पादनयंदा देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्याने संपूर्ण साखर उद्योग संकटात सापडला आहे. देशात यंदा साखरेचे उत्पादन २८५ लाख टन अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३१६ लाख टन झाले आहे. उत्तर प्रदेशमधून साखर घेतली तर वाहतूक खर्च कमी येत असल्याने गुजरात, राजस्थानसह इतर भागात सांगली-कोल्हापूरमधून जाणाºया साखरेचे प्रमाण घटले आहे. जिल्ह्यात यंदा उत्पादित साखरेतील केवळ १५ टक्के साखर विकली गेली आहे. उर्वरित साखर विक्रीविना पडून असल्याची माहिती साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिली.बैठकीतील मागण्या...सरकारने ऊस कारखान्यांना गाळप केलेल्या उसावर प्रतिटन ७०० रुपये अनुदान द्यावेकारखान्यांनी निर्यात केलेल्या साखरेस ५५ रूपयांऐवजी किमान १५० रुपये अनुदान द्यावेशॉर्ट मार्जिनमुळे थकीत जाणारी कर्जे एनपीएमध्ये धरु नयेत

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने