लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी :भिलवडी ग्रामपंचायतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीमध्ये नागरिकांना सवलत द्यावी, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पदाधिकाऱ्यांना दिले.
भिलवडीचे उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांना मनसेचे पलूस तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम, विभाग अध्यक्ष रोहित भोकरे, योगेश भागवत, वैभव येसूगडे, अंकुश सुपनेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. २०१९ मध्ये आलेला महापूर व २०२० मध्ये कोरोनासारखे संकट यामुळे सामान्यांचे जगणे आवघड झाले आहे. ग्रामपंचायतीचा विकास करायचा असेल तर कर वसूल होणे आवश्यक आहे. पण गेल्या दोन वर्षांत भिलवडीमधील सर्वसामान्यांचा आर्थिक स्तर खालावला आहे. एक महिन्यात थकीत व नियमित घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना ३० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.