कडेगाव : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रुग्णांना संतुलित आहार द्या, असे आवाहन आमदार मोहनराव कदम यांनी कर्मचाऱ्यांना केले.
विश्वजीत कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील कोविड रुग्णालये, कोरोना केअर सेंटर
तसेच गावोगावी कार्यरत असलेल्या संस्थात्मक विलगीकरण केंद्रांना फळे व पौष्टिक पदार्थ वाटप करण्यात येत आहेत. याचा प्रारंभ चिंचणी येथील विलगीकरण केंद्रात आमदार कदम यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी ते बोलत होते. यावेळी सोनहिरा करखान्यायार्फत २५ लीटर सॅनिटायझरही विलगीकरण केंद्रांना दिले.
आमदार कदम म्हणाले की, कोरोना रुग्णांनी कुटुंबातील आणि परिसरातील नागरिकांना कोरोनाची
बाधा होऊ नये यासाठी गावातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल व्हावे.
यावेळी नंदकुमार माने, संजय पाटील, वैभव गायकवाड, सुजित सबनीस, सुनील पाटील, अभिजित
माने आदी उपस्थित होते.
चौकट
सुरक्षा साधनांचा वापर करा
विलगीकरण केंद्रांमध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांना तसेच आशा स्वयंसेविकांना चांगले मास्क, फेस शिल्ड, हातमोजे, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधने कमी पडू नयेत याची दक्षता घ्या, असे आमदार मोहनराव कदम यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.