शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पुरावा द्या, राजकीय संन्यास घेतो : पृथ्वीराज देशमुख

By admin | Published: June 26, 2016 1:00 AM

अजित गुलाबचंदसह अन्य लोकांना अटक करा

सांगली : मी कोणतीही बेकायदेशीर गोष्ट केल्याचा विरोधकांकडे पुरावा असेल, तर तो त्यांनी सादर करावा. तो सिद्ध झाल्यास कायमचा राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन (एमटीई) सोसायटीच्या एका गटाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले की, तत्कालीन मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी बाळसिंग रजपूत यांनी न्यायालयात सादर केलेल्या चौकशी अहवालानुसार पोलिसांनी पर्यायाने शासनाने वालचंद ग्रुपचे अजित गुलाबचंद, रवींद्र पुरोहित यांच्यासह अन्य सहकाऱ्यांवर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी आम्ही आता करणार आहोत. रजपूत यांनी १४ जून २0११ रोजी चौकशी अहवाल जिल्हा न्यायालयात सादर केला आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार अजित गुलाबचंद यांच्यासह अन्य लोकांवर कागदपत्रांची आणखी छाननी करून अटक करावी, असा अहवाल दिला आहे. या अहवालाची प्रत आम्हाला मिळाली आहे. बनावट संकेतस्थळ निर्माण करण्यापासून अनेक नियमबाह्य गोष्टी त्यांनी केल्याचे अहवालात म्हटले आहे. विजय पुसाळकर यांचा सोसायटीशी काहीही संबंध नाही. जमीन हडपण्यासाठी वापरलेले ते एक प्यादे आहे. सोसायटीवर बेकायदेशीररीत्या ताबा मिळविण्यासाठीच त्यांनी सभेचा गोलमाल केला. एकाच सभेत राजीनामा, दुसऱ्या अध्यक्षाची निवडही केली. राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर राज्यातील नावाजलेले अभियांत्रिकी महाविद्यालय यशस्वीपणे चालविण्याचा अनुभव असल्याने मला एमटीईवर संधी मिळाली आहे. येथे येतानाच राजकीय जोडे बाहेर काढलेले आहेत. कायदेशीररीत्या मी या सोसायटीचा सभासद असल्यामुळे माझ्या पदनियुक्तीबाबत कोणतीही शंका कोणी उपस्थित करू शकत नाही. (प्रतिनिधी) निकालाची अपेक्षा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आम्ही केलेल्या तक्रारीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हा निर्णय लवकर अपेक्षित आहे. त्यातूनच खरे सत्य बाहेर येईल, असे दीपक शिंदे म्हणाले. दोघातील वाद पक्षाकडे... खासदार संजय पाटील आणि माझ्यातील वाद संस्थेविषयी आहे. वैयक्तिक किंवा पक्षीय स्वरूप त्याला दिलेले नाही. तरीही या वादानंतर पक्षाला एक अहवाल पाठविला आहे. याप्रकरणी नि:पक्षपातीपणाने चौकशी करून आदेश द्यावेत, अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांकडे व्यक्त केली आहे. पक्षाने किंवा कोणीही माझी बाजू घ्यावी, असे मला वाटत नाही. सत्यतेनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी केल्याचे देशमुख यांनी सांगितले. एका मिनिटात घरी जातो धर्मादाय आयुक्त, न्यायालय किंवा शासन यापैकी कोणीही माझी निवड बेकायदेशीर ठरविली तर एका मिनिटात निमूटपणे घरी जायला मी तयार आहे, असे देशमुख म्हणाले. तीन हजार कार्यकर्ते जमले होते संजयकाका पाटील यांनी केलेल्या दडपशाहीनंतर माझ्या घरी तीन हजार कार्यकर्ते प्रत्युत्तर देण्यासाठी जमले होते. त्यांना मी घरी जाण्यास सांगितले. बळाचाच वापर करायचा झाला, तर कधीही केला असता; मात्र आम्हाला या संस्थेत कायद्याचा वापर करायचा आहे, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.