जत तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. तसेच शिक्षक संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी नसल्याने त्याचा ताण यंत्रणेवर पडत आहे. जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ४३६ आहे. यात मराठी माध्यम शाळेत शिक्षकांची रिक्त पदे १३३, कन्नड माध्यम शिक्षकांची रिक्त पदे ७६, उर्दू माध्यम १८ अशी रिक्त पदे आहेत. तसेच जत तालुक्यात कन्नड माध्यमाच्या शाळाही मोठ्या प्रमाणात आहेत. २०१० पासून कन्नड शिक्षकांची भरती करण्यात आली नाही. कन्नड शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
आमदार विक्रम सावंत यांनी तालुक्याला लवकर पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी आणण्यासाठी व कन्नड शिक्षक भरती करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
उमदी केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचे पगार वेळेत होत नाहीत याबाबतची तक्रार केली असता आमदार सावंत यांनी मंगळवारी सीईओची भेट घेऊन तो प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. यावेळी उपाध्यक्ष अविनाश सुतार, जितेंद्र बोराडे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.
110721\img_20210711_164052.jpg
जत शिक्षण विभागाला पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी द्या : शिक्षक भारतीची आमदार विक्रम सावंत यांच्याकडे मागणी