डॉ. वाघ म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना आपल्या रोजच्या जीवनात गरजेच्या असलेल्या गोष्टी करण्यासाठीच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. आपल्यापरीने आपण दिव्यांगांना मदत केली पाहिजे.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. बी. टी. कणसे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचे केंद्र संयोजक प्रा. अण्णासाहेब बागल यांनी दिव्यांगांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
दिव्यांग समितीचे समन्वयक प्रा. जे. ए. यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. के. एन. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. दतात्रय थोरबोले, प्रा. सुनील गावित, डॉ. हाजी नदाफ, प्रा. अमित माळी, डॉ. विनोदकुमार कुंभार, प्रा. साईनाथ घोगरे उपस्थित होते.
फाेटाे : ०४ तासगाव १