शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

दूध उत्पादकांना चार महिन्यांसाठी अनुदान द्या, स्वतंत्र भारत पक्षाची मागणी 

By अशोक डोंबाळे | Published: February 03, 2024 6:40 PM

शासनाकडून केवळ महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभागाकडून केवळ एक महिन्यासाठीच अनुदानाची घोषणा केली आहे. प्रत्येक्षात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांत दुधाचा पुरवठा जास्त होतो. त्यामुळेच दुधाचे दर कमी होत आहेत. म्हणून शासनाने चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान देण्याची गरज आहे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी शासनाकडे केली आहे.स्वतंत्र भारत पक्षातर्फे शासनाकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, ५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळण्यासाठी अनुदान योजना राबवण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी ११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. वास्तविक थंडीच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये दुधाचा पुरवठा जास्त असल्याने दुधाचे दर कमी होतात. मात्र, शासनाने एकाच महिन्यासाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले आहे. वास्तविक ते चार महिने शासनाने अनुदान दिले पाहिजे. तसेच अनुदान देतानाही काही त्रुटी आहेत. शासन निर्णयामध्ये म्हटले की, दूध संघांनी किमान २७ रुपये प्रति लिटर दर दूध उत्पादकांना दिला पाहिजे, असे बंधनकारक केले आहे. याचा दूध संघांनी सोयीचा अर्थ काढून पूर्वी दूध उत्पादकांना ३२ रुपये प्रति लिटर दर मिळत होता. त्यामध्ये कपात करुन दूध संघांकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर २७ रुपये दराने बिले दिली जात आहेत. शासनामार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा होणार नाही. तरी पूर्वीचा जो दर २७ रुपयांपेक्षा जास्त देण्यात येत होता, त्याप्रमाणेच द्यावा, अशी मागणीही केली आहे. दूध संघचालक देत असलेल्या दरावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान दूध उत्पादकांना मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे, असेही सुनील फराटे म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीmilkदूधGovernmentसरकार