शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

सुवर्णनगरीत नाथाचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:45 PM

विटा : ‘श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं... श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष, गुलालाची प्रचंड उधळण आणि शोभेच्या दारूच्या नयनरम्य आतषबाजीत ...

विटा : ‘श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं... श्री नाथबाबांच्या नावानं चांगभलंऽऽ’चा जयघोष, गुलालाची प्रचंड उधळण आणि शोभेच्या दारूच्या नयनरम्य आतषबाजीत विट्याचे ग्रामदैवत श्री नाथबाबांची यात्रा रविवारी शांततेत, भक्तिपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडली.रविवारी रात्री हत्ती, घोडे, मोरांगी वाद्यासह ‘श्रीं’च्या पालखीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती. अत्यंत शांततामय वातावरणात श्री नाथबाबांच्या पालखीचा सोहळा पार पडला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.विटा शहराचे ग्रामदैवत श्री नाथ देवाच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे. रविवार, दि. २८ रोजी सायंकाळी पाच वाजता अंमलीच्या गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यापूर्वी म्हणजे शनिवारी मध्यरात्री १२ वाजता श्रींचा जन्मकाळ झाला. रविवारी सायंकाळी ९ वाजता श्रीं चा पोशाख, श्रींचा छबिना व पालखीची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.रविवारी काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीच्या सोहळ्यात विटा व परिसरातील हजारो भाविक सहभागी झाले होते. पहाटे तीन वाजेपर्यंत देवांच्या पालख्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. विट्यात नाथाष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांच्या उपस्थितीत व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी विट्याचे ग्रामदैवत श्री नाथाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अमरसिंह निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.