फोटो ओळ : कुपवाडमध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा ‘कोरोना योध्दा’ म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली यांच्यावतीने कोविड योध्द्यांचा गौरव करण्यात आला, अशी माहिती नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी दिली.
नगरसेविका कोळेकर म्हणाल्या, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्लीच्यावतीने सांगली जिल्ह्यातील संघटनेच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोरोना कालावधीत अनेक नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्याने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्याहस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी छाया हाक्के, शर्मिला पाटील, विलास गावडे, धोंडीराम हाक्के, संतोष सिसाळ, माया पाटील, मयूर माने, सुनीता धायगुडे, सुप्रिया माने, सुदाम पडळकर उपस्थित होते.