शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

व्यापाऱ्यांविरोधात न्यायालयात जाणार

By admin | Published: December 02, 2014 10:25 PM

हणमंत पवार : ‘व्हॅट’पेक्षाही मोठा घोटाळा

सांगली : लोकांकडून कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करून व्यापाऱ्यांनी स्वत:जवळ बाळगल्याने हा मध्यंतरीच्या हवाला घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा आहे. तरीही महापालिका नागरी हितापेक्षा व्यापाऱ्यांचे हित पाहून कारवाई करण्यास तयार नाही. त्यामुळे आयुक्त व व्यापारी यांच्याविरोधात आम्ही जनहित याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती माजी नगरसेवक हणमंत पवार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी ग्राहकांकडून रितसर कर गोळा केला आहे. त्यांचा व्यापारही चालू आहे. व्यवसाय करूनही त्यापोटीचा कर भरण्यास ते तयार नाहीत. २ हजारावर व्यापारी प्रामाणिकपणे कर भरत असताना अन्य व्यापाऱ्यांकडूनच का विरोध होत आहे? कर गोळा होत नसल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर व नागरी आरोग्यावर झाला आहे. गॅस्ट्रो व अन्य साथीच्या रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागण्यासही अप्रत्यक्षरित्या व्यापारीच कारणीभूत आहेत. त्यांनी कर भरला असता, तर प्रत्येक प्रभागात उपाययोजना व स्वच्छतेची कामे मार्गी लागली असती. ड्रेनेजची कामेही सध्या पैशाअभावी ठप्प आहेत. नगरसेवकांनी महापालिकेकडे विचारणा केल्यानंतर, वारंवार एलबीटी बहिष्काराचे कारण पुढे केले जाते. वास्तविक व्यापाऱ्यांनी टाकलेल्या या बहिष्कारामुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. (प्रतिनिधी)