शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मालकाविना एकटाच दूध वाहतूक करतोय सोन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:58 PM

मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून काळमवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांचा सोन्या मालकाविनाच दररोज अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर कापत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात ४०० लिटर दुधाची वाहतूक स्वत:च करतो आहे. त्यामुळे साळुंखेंचा प्राणप्रिय सोन्या बैल परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

ठळक मुद्देमालकाविना एकटाच दूध वाहतूक करतोय सोन्या

युनूस शेख इस्लामपूर : मालकाची आज्ञा शिरसावंद्य मानून काळमवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी लक्ष्मण साळुंखे यांचा सोन्या मालकाविनाच दररोज अडीच ते तीन किलोमीटरचे अंतर कापत सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात ४०० लिटर दुधाची वाहतूक स्वत:च करतो आहे. त्यामुळे साळुंखेंचा प्राणप्रिय सोन्या बैल परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानले जाते. पूर्वी शेतीच्या कामात यांत्रिकीकरण नव्हते. त्यामुळे बैलच शेतकऱ्यांचा प्राण असायचा. तो त्यांच्या कुटुंबातील इतरांप्रमाणे कर्ताही असायचा. या सर्व जिव्हाळ्याच्या नात्यामधून शेतकरी बैलांमध्येच देवत्व पाहायचे. अलीकडच्या काळातील यांत्रिकीकरणाच्या झपाट्यातही असेच देवत्व जपले आहे, काळमवाडी येथील शिवाजी साळुंखे यांच्या शेतकरी कुटुंबातील सोन्या नावाच्या बैलाने.शिवाजी साळुंखे (वय ६५) यांची गावापासून बाहेर वाटेगाव रस्त्यावर १० एकर शेती आहे. तर जवळपास ५० गार्इंचा गोठा आहे. त्यांची चार मुले सागर, सुदाम, सुधीर आणि सुनील सर्वजण शेती कामात मदत करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या देशी गाईचे सोन्या हे अपत्य.

आज सोन्या १२ वर्षांचा आहे. सोन्या चार वर्षाचा होता, तेव्हापासून तो साळुंखे यांच्यासोबत दुधाची वाहतूक करायचा. दूध घालण्यासाठी डेअरीकडे जाताना सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला सोन्याची रपेट व्हायची.साळुंखे सांगतात, सात-आठ वर्षांपूर्वी एका प्रसंगी दूध घालण्यासाठी सोन्याला एकट्याला पाठवायचे, असा विचार मनात आला. सकाळी गावातील घरापासून सोन्या सवयीप्रमाणे गोठ्यावर आला होता. गाडीत ४० लिटरचे पाच कॅन म्हणजे २०० लिटर दूध ठेवले आणि कासरा सोन्याच्या अंगावर टाकला, त्याचक्षणी त्याने चालायला सुरुवात केली.

शेतातील अरूंद वाटेवरून जाताना त्याने दोन्ही बाजूला असणाऱ्या मका आणि उसाच्या पिकाला तोंडही लावले नाही. काळमवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आल्यावर डाव्या बाजूने आपली गाडी घेऊन निघाला. पुढे गावात देवळाजवळील वळण आणि अरूंद रस्त्यावरून जात डेअरीसमोर येऊन थांबला.

या घटनेने सर्वांनीच आश्चर्याने तोंडात बोटे घातली. त्यानंतर मोकळे कॅन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू करून तो शेतात गोठ्यावर आला. या प्रवासानंतर सुरू झालेला हा मालकाविना दुधाची वाहतूक करण्याचा सोन्याचा आवडीचा छंदच बनून गेला आहे.

टॅग्स :Sangliसांगली