दिघंची : दिघंची (ता. आडपाडी) येथे भरदिवसा शुभम ज्वेलर्स या सराफ दुकानात कामगारावर चाकुने वार करत सुमारे दोन लाख १२ हजार रुपयांचे ५३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही थरार घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गजबलेल्या बाजारपेठेत घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबत रोहित दगडू भोसले (वय २२ रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने फिर्याद दिली आहे.
दिघंची येथे मुख्य बाजारपेठेत दत्ता यादव यांच्या मालकीचे शुभम ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. या दुकानात त्यांचा भाचा रोहित भोसले हा कामगार म्हणुन आहे. बुधवारी दुपारी २ वाजता दोन अनोळखी व्यक्ती सोने खरेदीची बहाण्याने दुकानात आले. यातील एकाने तोंडाला मास्क घातला होता. यावेळी रोहित भोसले हा दुकानात होता. त्यांनी रोहितकडे सोन्याच्या दागिन्यांची मागणी केले. ते दाखवत असतानाच एकाने स्वत:जवळील चाकू काढत रोहितवर वार केला. हा वार रोहितच्या गळ्यावर झाला.
याचवेळी दुसऱ्या चोरट्यांनी कपटाच्या काचा फोडून त्यातील चार ट्रे घेऊन बॅगेत भरले. यात झुबे, गळ्यातील बदाम, टॉप्स, नेकलेस, ठुशी, लटकन असे सोन्याने दागिने होते. यावेळी रोहित भोसलेने आरडा ओरड केली. मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून तेथून पसार झाले होते.
घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास गभाले यांनी पाहणी केली. तम्मा चोरुमले, नितीन मोरे आदी पोलीस कर्मचारी होते. संशयित चोरटे म्हसवड रस्त्याच्या दिशेने पसार झाल्याचे समजते. यामुळे म्हसवड व हिंगणी या परिसरात पोलिसांची दोन पथके तपासासाठी रवाना झाली आहेत.
चाैकट
पैसे मागत असल्याचे भासवले
घटनस्थळावर नागरिकांना शंक नको म्हणुन ‘तू माझे पैसे का दिले नाहीत, पैसे कसे देत नाही’ असे म्हणत आपण पैसे मागत असल्याने चोरट्यांनी भासवले व शिवीगाळ करत दुकानातून बाहेर पडत दुचाकीवरुन पसार झाले.
चाैकट
फोटो-१)१७दिघंची१
२)१७रोहित भोसले (जखमी)
फोटो ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे भरदिवसा शुभव ज्वेलर्स या सराफी दुकानात चोरी झाली. घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास गभाले यांनी पाहणी केली.