लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : आळंदी ते पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने त्याबाबतची आधी सुचनाही गेल्यावर्षी प्रसिध्द केली होती. त्यामुळे निधीअभावी कासवगतीने सुरु असणारे चौपदरीकरणाचे काम गती घेईल असे वाटत असतानाच सध्यपरिस्थितीत काम पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे पालखी मार्गाच्या समस्या जैसे थे अशाच आहेत. तसेच अनेक ठिकाणी मुरमीकरण झालेल्या ठिकाणी वेड्याबाभळीही उगवल्या आहेत. या मार्गाचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने सध्या वाहतुकीला समस्या असतानाही पालखी काळात त्या जास्त प्रमाणात जाणवणार आहेत. अनेक पुलांची कामे अर्धवट आहेत. अनेक ठिकाणी एकाच बाजुचा रस्ता चालू आहे, त्या ठिकाणी बंद पडलेल्या कामांमुळे रस्त्याला अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर मुरमीकरण झालेल्या रस्त्यावर चक्क वेड्या बाभळी उगवल्या आहेत. काळजमध्ये प्रवेश करताना रस्ता अचानक अरुंद होतो. येथील पुलाचे काम अर्धवट आहे, तसेच सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ही आहे.त्यापुढे निंभोरे येथे पुलाचे एकाच बाजूचे तेही अर्धवट काम झाले आहे. या ठिकाणी अचनक मोठा पाऊस झाल्यास रस्ता पूर्णपणे बंद होतो. त्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. पुढे तेज पेट्रोल पंप ते जिंती नाका या दरम्यान ही रस्ता अरुंद आहे. तसेच मुरमीकरण झालेल्या भागात वेड्या बाभळी उगवल्या आहेत.
पालखी मार्गावर उगवल्या बाभळी!
By admin | Published: June 14, 2017 11:07 PM