गजानन पाटील ।संख : दुष्काळ, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे जत तालुक्यात यावर्षी बेदाणा उत्पादनात घट झाली आहे. मात्र तरी, तासगाव बेदाणा बाजारपेठेत झालेल्या बेदाणा सौद्यात उमदी (ता. जत) येथील लक्ष्मण पांडुरंग पवार या शेतकऱ्याच्या हिरव्या सुटेखानी बेदाण्यास ३५५ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बेदाण्याला ८० ते ९५ रुपये जादा दर मिळत आहे. गणेशचतुर्थीनंतर देशभरात वेगवेगळे सण सुरू होतात. त्यामुळे बेदाण्याला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. १५ ते २० रुपयांनी दर वाढणार आहे. यंदा बेदाणा उत्पादक शेतकºयांना अच्छे दिन येणार आहेत.
तालुक्यातील द्राक्षबागायतदार शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे बागायती पिके न घेता द्राक्षे, डाळिंब फळबागांकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. बिळूर, तिकोंडी, भिवर्गी, करजगी, कोंतेवबोबलाद परिसरातील शेतकरी द्राक्षांचे मार्केटिंग करतात, तर सिद्धनाथ, उमदी, जालिहाळ खुर्द, कागनरी, मुचंडी परिसरातील शेतकºयांचा बेदाणा करण्याकडे कल असतो. व्यापारी नफेखोर वृत्तीमुळे वेगवेगळी कारणे दाखवून दर पाडतात. तसेच पैसे देत नाहीत. फसवणूक करतात. त्यामुळे शेतकरी बेदाणा करण्याकडे वळला आहे.
राज्यात तासगाव बाजार समिती ही बेदाणा उलाढालीसाठी सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. सांगली, सोलापूर, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील बेदाणाही येथे विक्रीसाठी आणला जातो. तसेच तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, कन्याकुमारी, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात या राज्यांसह देशभरातून व्यापारी बेदाणा खरेदीसाठी येत असतात.
जगभरातील बेदाणा उत्पादनावर दराचे गणित ठरत असते. मात्र चव आणि उच्च प्रती, दर्जेदार सुटेखानी निर्मितीमुळे सांगली, विजापूर, सोलापूर या जिल्ह्यातील बेदाण्याला अधिक मागणी आहे. यंदा इराण, अफगाणिस्तान या देशातील उत्पादन कमी झाल्याने भारतीय बेदाण्याला मागणी वाढली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड देत शेतकºयांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. हिरव्या बेदाण्यास २०५ ते ३५५ रुपये, पिवळ्या बेदाण्यास १९० ते २३०, काळ्या बेदाण्यास ८५ ते १०५ रुपये असा दर मिळाला आहे.निसर्गाने मारले, दराने तारलेपावसाने दडी दिल्याने द्राक्षे, डाळिंब बागायतदार अडचणीत सापडला आहे. सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यातील छाटणीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. असे असताना ‘निसर्गाने मारले, दराने तारले’ अशी परिस्थिती शेतकºयांची झाली आहे. ‘बेदाण्याला बाजारात दर मिळत आहे. कर्जाची परतफेड होण्यास मदत होणार आहे. पुढील हंगामासाठी मशागत कामासाठी पैसे येणार आहेत, असे बेदाणा शेतकरी कामाण पाटील म्हणाले.पिवळे, काळे बेदाणे : निर्यातीत वाढआखाती देशात इराणमधून येणाºया बेदाण्याची आवक कमालीची घटली आहे. सध्या फायदा भारतीय बेदाण्यास झाला आहे. बेदाण्याची निर्यात मोठी झाली आहे. हिरवा बेदाणा श्रीलंका, बांगलादेशातही निर्यात झाला आहे. ३५ टक्के बेदाणा निर्यात होतो.
उत्पादनावर दृष्टिक्षेप२०१८- १ लाख ४० हजार टन२०१७ - १ लाख ६० हजार टन