शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

खूषखबर...चिऊतार्इंची संख्या वाढली! सांगली शहरात १२ हजार ४०३ चिमण्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:40 PM

सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांकडून निरीक्षण

सांगली : सकाळच्या प्रहरी चिमण्यांचा चिवचिवाट प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी, वाढलेल्या इमारती व वृक्षांचे घटते प्रमाण यामुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र, सांगली शहरातील पक्षीप्रेमींनी एकत्र येत यंदा केलेल्या पाहणीत शहरात चिमण्यांची संख्या वाढली असून, १२ हजार ४०३ चिमण्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी शहरात ३ हजार १७० चिमण्यांची नोंद झाली होती.

जिथे मानवाची वस्ती, तिथे चिमण्यांचीही वस्ती, असे समजले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चिऊतार्इंच्या वास्तव्याचाच प्रश्न गंभीर बनत चालल्याने चिवचिवाट कमी ऐकू येत होता. घरट्यांची संख्याही कमी असल्याने अडचणी वाढल्या होत्या. यावर उपाय म्हणून खोपा बर्डस् हाऊसतर्फे शाळांमध्ये एक हजार घरटी मोफत दिली आहेत.

शहरातील चिमण्यांची नेमकी संख्या किती, हा औत्सुक्याचा विषय असल्याने गेल्या पंधरवड्यात ‘खोपा बर्डस् हाऊस’ व ‘बर्डसॉँग’ संस्थेतर्फे शहरातील १३ शाळेतील ४३५ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी चिमण्यांचे निरीक्षण केले होते. त्या नोंदीचा अहवाल तयार केला. त्यानुसार शहरात १२ हजार ४०३ चिमण्या असल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी शहरातील ११ शाळेतील १८४ विद्यार्थ्यांनी निरीक्षण नोंदविले होते. त्यात ३ हजार १७० चिमण्यांची नोंद झाली होती. 

सांगली शहरात खोपा बर्डस् हाऊस व बर्ड सॉँग संस्थेतर्फे चिमण्यांची गणना करण्यात आली. यासाठी शालेय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. जेणेकरून त्यांचे पक्ष्यांविषयीचे कुतूहल जागृत रहावे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर तयार केलेल्या घरट्यांची संख्या ६ हजारवर गेली आहे. चिमण्यांसाठी घरटी मिळाल्यानेही चिमण्यांची संख्या वाढली आहे.- सचिन शिंगारे, पक्षी निरीक्षकव संयोजक.