सांगली : दोन कुटुंबांना, दोन जिवांना एकाच बंधनात बांधणारा योग म्हणजे विवाह! एखाद्या घरात असा प्रसंग असेल तर सुरु असणारी लगीनघाई जोरात सुरु असते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून असलेल्या कोरोनाच्या सावटामुळे विवाहाच्या उत्साहाला मुरड घालत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागत आहे. तरीही या महिन्यात लग्नाचा उत्साह असणार आहे.
चौकट
या महिन्यातील मुहूर्त
गेल्या तीन महिन्यांपासून लग्नाचे मुहूर्त असले तरी प्रत्यक्षात निर्बंधांमुळे या मुहूर्तांना लग्नांचे प्रमाण कमी झाले आहे. या महिन्यात १ व २ जुलै रोजीही मुहूर्त होते तर यासह २, १३ आणि १५ तारखेला विवाहासाठी योग्य मुहूर्त आहेत. त्यानंतरच्या पंधरवड्यात मुहूर्त असून, त्यातही विवाह होणार आहेत.
चौकट
या आहेत अटी
कोरोनाचा वाढता संसर्ग जिल्ह्यात अद्यापही कायम असल्याने निर्बंधही कायम आहेत. त्यात गेल्या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक आढळल्याने नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार २५ जणांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी असणार आहे. त्याशिवाय उपस्थित असणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी निगेेटिव्ह असणे बंंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
चौकट
परवानगीसाठी अग्नीदिव्य
* सध्या कोरोना निर्बंधांमुळे २५ जणांच्याच उपस्थितीत विवाह होत आहेत. यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक आहे.
* विवाहाची तारीख व स्थळाबरोबरच उपस्थितीबाबत हमी लिहून दिल्यानंतर परवानगी दिली जात आहे.
* ग्रामपंचायत स्तरावर व पोलीस, महसूल विभागातर्फे मात्र या विवाह समारंभांवर वॉच असणार आहे.
चौकट
वधू-वर पित्याची कसरत
कोट
लग्न अचानक ठरल्याने उत्साह होता, मात्र नियमांचे पालनही बंधनकारक आहे. त्यामुळे परवानगी घेऊनच व मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ झाला आहे.
- सीताराम खोत
कोट
मुलाचा विवाह थाटामाटात करण्याची इच्छा होती. मात्र, कोरोना नियमांमुळे अडचणी आहेत. त्यामुळे नियमांचे पालन केले. रितसर परवानगी घेऊनच पुढील आठवड्यात मुहूर्त करणार आहे.
- बापूसाहेब शिंदे