शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

गोपीचंद पडळकर समर्थकांकडून खासदार समर्थकांचा निषेध

By अविनाश कोळी | Published: January 10, 2024 7:11 PM

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे खासदार संजय पाटील यांचा आटपाडी तालुक्यातील वंचित १३ गावांचा समावेश टेंभू योजनेत समावेश ...

दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथे खासदार संजय पाटील यांचा आटपाडी तालुक्यातील वंचित १३ गावांचा समावेश टेंभू योजनेत समावेश केल्याबद्दल दिघंची येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान फलकावर आमदार गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र नसल्याने पडळकर समर्थकांनी या कार्यक्रमाचा निषेध केला.दिघंची येथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने फुले-शाहू-आंबेडकर चौक ते दिघंची हायस्कूलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा खांबांवर विविध नेत्यांचे फलक लावण्यात आले हाेते. या फलकांवर आमदार गोपीचंद पडळकर यांचे छायाचित्र नसल्याने पडळकर समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. खासदारांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा समाजमाध्यमांवर जाहीर निषेध व्यक्त करत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.आमदार गोपीचंद पडळकर गटाला डावलून खासदार संजय पाटील गटाला काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार पडळकर गटाला डावलल्याने दिघंची जिल्हा परिषद गटातील आमदार व खासदार समर्थकांमधील धुसफुस समाेर आली आहे. खासदार संजय पाटील यांच्या कार्यक्रमाला पडळकर गटाचा कोणताही नेता अथवा एकही समर्थक उपस्थित नसल्याने आमदार व खासदार गटाचे बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरPoliticsराजकारण