शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

चांदोली धरण गळतीमुक्त होणार, या धरणाचे आहे एक खास वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 2:23 PM

धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

वारणावती : चांदोली धरणाची गळती थांबविण्यासाठी शासनाने ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे धरण गळतीमुक्त होईल व लाखो लीटर पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा पश्चिम विभागातील चांदोली धरण हे मातीचे राज्यातले दोन नंबरचे धरण आहे. २००२मध्ये धरणाच्या वक्राकार दरवाजाचे काम पूर्ण झाल्यानंतर ९७४.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३४.४० टीएमसी इतका प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाला. त्यातील ७७९.२१ दशलक्ष घनमीटर म्हणजे २७.५२२ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.

चांदोली धरणातील पाणी साठवण सुरू झाल्यापासून धरणातून गळती सुरू आहे. त्यातून लाखो लीटर पाणी वापराविना वाया जात आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने गळती नियंत्रणात आणण्यासाठी गळती प्रतिबंधक उपाययोजनांच्या कामाला विशेष दुरूस्ती अंतर्गत ५४ कोटी ८५ लाख ८३ हजार ६८३ रूपयांच्या अंदाजपत्रकाला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.ही मंजुरी देताना धरणाच्या निकृष्ट दर्जाबाबत जबाबदार असणारे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर आवश्यक जबाबदारी निश्चितीची व अनियमिततेची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करावी व समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही करावी, या अटी, शर्तीसह १४ अटी अंदाजपत्रकात देण्यात आल्या आहेत.

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण

राज्यातील दोन नंबरचे मातीचे धरण असणाऱ्या या वारणा (चांदोली) प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात १९७६पासून सुरू करण्यात आले. त्यानंतर २०१६मध्ये ११७४.९८ कोटी किमतीला तृतीय सुधारित मान्यता मिळाली. मार्च २०२० अखेर ८५०.२८ कोटी खर्च झाला. उर्वरित किंमत ३२४.७० कोटी आहे. तृतीय मंजूर सुप्रमाप्रमाणे २०४.७५ कोटी इतकी तरतूद असूनही १९१.७० कोटी खर्च झाला. वारणा नदीच्या पात्रात हे धरण असून, ते मातीचे आहे. त्याची एकूण लांबी १,५८० मीटर असून, पैकी ८३१.५० मीटरचा भाग मातीचा व उर्वरित ७४८.५० मीटरमध्ये दगडी धरण बांधण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरण