शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शासन संकटातील शेतकऱ्यांच्या पाठीशी

By admin | Published: December 14, 2014 10:34 PM

दिवाकर रावते : गार्डी परिसरातील अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी

विटा : गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने राज्यात द्राक्षांचे सुमारे दोन ते तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करून माहिती संकलित करीत आहोत. या पाहणी दौऱ्यानंतर नुकसानीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात येईल, असे सांगून आम्ही आता राज्याच्या सत्तेत असलो तरी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या नैसर्गिक संकटात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.खानापूर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी मंत्री रावते यांनी आज रविवारी केली. यावेळी त्यांनी गार्डी परिसरात नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत आ. अनिल बाबर, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, तालुकाप्रमुख संजय विभुते, उपसभापती सुहास बाबर, अमोल बाबर, बजरंग पाटील उपस्थित होते. यावेळी मंत्री रावते यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षबागांची पाहणी केली.त्यावेळी आ. अनिल बाबर यांनी मंत्री रावते यांना आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ सहन केला. गेला खरीप हंगाम पावसाच्या उशिरा आगमनाने हाती लागला नाही. आता रब्बी पिकांची आशा धरून बसलेले शेतकरी व द्राक्षबागायतदारांचे अवकाळीने मोठे नुकसान केल्याचे सांगितले. त्यामुळे शासनस्तरावर शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगितले. यावेळी मंत्री रावते यांनी नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना पिकांचा क्षेत्रनिहाय विमा मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे सांगून पीक विम्याबाबतचे निकष बदलण्यासाठी विचार सुरू आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, असे सांगितले.यावेळी गार्डी येथील द्राक्षबागायतदार हेमंत बाबर यांनी शेती कर्जाचे प्रोत्साहन अनुदान गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असल्याचे मंत्री रावते यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी रावते यांनी आ. अनिल बाबर यांच्याशी चर्चा करीत हे अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत महाजन, हेमंत बाबर, शंकर मोहिते उपस्थित होते. (वार्ताहर)नेवरीत पाहणीनेवरी : नेवरी येथील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. त्यांनी ढवळे मळ्यानजीक शेतात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ऊस, मका या पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री रावते यांच्याकडे तालुक्यातील महावितरण, कृषी विभाग या विभागांच्या अनागोंदी कारभाराबाबत तक्रारी केल्या.