सांगली : कर्मचाºयांच्या प्रश्नांवर सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. आजवर कर्मचाºयांच्या मागणीसाठी सरकारला विनंती केली. मात्र, आता विनंती न करता तीव्र आंदोलन करणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हा परिषद कर्मचाºयांना दुजाभावाची वागणूक मिळत असून न्याय न मिळाल्यास बेमुदत संपाची हाक देण्यात येईल, असा इशारा राज्य जिल्हा परिषद युनियनचे प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी गुरूवारी येथे दिला. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने आयोजित कर्मचाºयांच्या बैठकीत मगर बोलत होते.मगर पुढे म्हणाले की, शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. कर्मचाºयांच्या मागण्य मान्य न करता आंदोलन चिरडून टाकण्यावर सरकारचा भर आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे ४७ संघटनांचे प्रतिनिधीत्व करत असून १९७७-७८ मध्ये ५५ दिवसांचा संप केल्यानंतर वेतनश्रेणीबाबत धोरणात्मक निर्णय सरकारने घेतला होता. आताही सरकारचे कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे.यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे, कर्मचारी युनियनचे बजरंग संकपाळ, दादासाहेब पाटील, सचिव दत्तात्रय शिंदे, प्रमोद तारळकर, अभय पोतदार, अशोक पाटील, प्रदीप जगताप, शंकरराव काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते....अन्यथा लाँग मार्चसरकारकडून कर्मचाºयांवर वारंवार अन्याय होत असल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी सर्वसमावेशक आंदोलन आवश्यक आहे. सातवा वेतन आयोग, जुनी पेन्शन योजना आदी मागण्यांसाठी लवकरच लाँग मार्च काढावा लागणार आहे. सरकारविरोधातील लढाईसाठी कर्मचाºयांनी तयार राहावे, असे आवाहन मगर यांनी केले.सांगलीत गुरुवारी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बलराज मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक पाटील, शंकरराव काळे, दादासाहेब पाटील, अरूण खरमाटे, सुभाष मरिगुद्दी आदी उपस्थित होते.
सरकारकडून कर्मचाऱ्यांना दुजाभावाची वागणूक : बलराज मगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:27 PM
सांगली : कर्मचाºयांच्या प्रश्नांवर सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषद कर्मचारी युनियनची बैठक; आंदोलन छेडण्याचा इशारा