शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:21 AM

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ...

तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दुसºया प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.तासगाव येथील लेखणीसम्राट गणपतराव व्ही. माने चिंचणीकर साहित्यनगरी येथे प्रतिष्ठा फौंडेशनच्यावतीने दुसरे प्रतिष्ठा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. तहसीलदार सुधाकर भोसले स्वागताध्यक्ष होते.सबनीस पुढे म्हणाले, महाराष्टÑातील लोकसाहित्यिकांना, कलावंतांना अखेरच्या काळात जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ येते. त्यांना ताठमानेने जगणेही मुश्किल होेते. मात्र, अशा कलावंतांना, साहित्यिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी साधी मदतही करण्याची कुवत या सरकारची आणि राजकारण्यांची नाही. सरकारचा करंटेपणा आणि निष्क्रियतेमुळे लोककलावंतांच्या पदरी उपेक्षिताचे जीणे आले आहे. नवनवीन लेखक उदयास येत आहेत. मात्र सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे. संस्कृती शुध्दीकरण झाले पाहिजे आणि यासाठी साहित्य संमेलने तुरटीसारखे काम करतात. पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात.यावेळी चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या कविसंमेलनासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर जयवंत आवटे यांचे कथाकथन झाले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, कविसंमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संयोजक तानाजी जाधव यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते. तहसीलदार भोसले, डॉ. गुरव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.यावेळी गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना ‘प्रशासनरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.नेत्यांवर निशाणागेल्या काही वर्षात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर परखड मत मांडताना सबनीस यांनी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्टÑ जातीपातींनी दुभंगलेला आहे. राजकीय नेते शुध्दतेचा आव आणत आहेत. मात्र त्यांच्या चारित्र्यावर कलंकतेचा डाग आहे. राजकीय व्यवस्था मोडित निघालेली असताना समाजाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यातून नवा महाराष्टÑ, नवा भारत उभा करावा लागेल. महापुरुषांच्या नावाने समाज, धर्म बिघडवला जात आहे, साहित्यातून तो बिघडवू देऊ नका. भारतीय संस्कृती ही महान आहे. जगभरात तिचे दाखले दिले जातात. त्यामुळे साहित्यीकांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.