शिराळा : राज्य शासनाला दखल घ्यावीच लागेल, असा शेतकऱ्यांचा मोर्चा १६ डिसेंबरला शिराळ्यात निघेल, असा विश्वास माजी आमदार मानसिंंगराव नाईक व प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. चिखली (ता. शिराळा) येथे झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते.नाईक म्हणाले की, शिराळा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. निधीअभावी वाकुर्डे योजना व गिरजवडे प्रकल्पाचे काम रखडले आहे. शासनाच्या मदतीची गरज असताना, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. देशमुख म्हणाले की, शासनाला जाणीव करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे नियोजन केले आहे. के. डी. पाटील यांनी स्वागत केले. अभिजित पाटील, बाजीराव शेडगे, विकास नांगरे, प्रकाश धस, विष्णू पाटील, जे. डी. खांडेकर व संपतराव देशमुख यांचेही मनोगत झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, विलासराव पाटील, अमरस्ािंंग नाईक, अॅड. भगतसिंंग नाईक, अशोकराव पाटील, शिवाजीराव घोडे, बी. जी. पाटील, राजेंद्रसिंंह नाईक, सुरेश चव्हाण, सभापती चंद्रकांत पाटील, सम्राटसिंह नाईक, संपतराव शिंदे, विराज नाईक, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. उषाताई दशवंत, तालुकाध्यक्ष डॉ. मीनाक्षीताई पाटील, सुनंदा सोनटे उपस्थित होते. विजयराव नलवडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शासनाने दखल घ्यावी असा १६ रोजी मोर्चा काढू
By admin | Published: December 11, 2015 10:44 PM