इस्लामपूर : कोरोनाच्या संकट काळात आपले काय हाल झाले आहेत, याची कल्पना आम्हाला आहे. काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आपले प्रश्न समजावून घेऊन ते शासन स्तरावर सोडविण्याचा प्रयत्न करू, या शब्दात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तमाशा कलावंतांना धीर दिला.
राजारामनगर येथे आविष्कार कल्चरल ग्रुपच्यावतीने पाटील यांच्याहस्ते वाळवा तालुक्यातील तमाशा कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले. बाळासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे, आविष्कारचे मोहन चव्हाण, कार्याध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, उपाध्यक्ष भूषण शहा, माजी अध्यक्ष सतीश पाटील, प्रा. कृष्णा मंडले, सचिव विश्वनाथ पाटसुते, सहसचिव विजय लाड उपस्थित होते.
पाटील यांनी तमाशा कलावंतांशी थेट संवाद करीत त्यांचे प्रश्न-अडचणी समजून घेतल्या. यावेळी स्व. गुलाब बोरगावकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव मुबारक जमादार, स्व. साधू-आत्मा कासेगावकर यांचे चिरंजीव मुरारी पाटसुते, शिगावचे तुषार गोसावी यांनी तमाशा कलावंतांच्या व्यथा मांडून शासनस्तरावर तमाशा कलावंतांना मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अध्यक्ष सुनील चव्हाण, सरपंच बाबूराव पाटील, बालाजी पाटील, धनंजय भोसले, लव्हाजी देसाई, विनायक यादव, संजय पाटील, अजय थोरात, हमीद लांडगे उपस्थित होते.
फोटो : २० इस्लामपुर १
ओळी : राजारामनगर येथे आविष्कारच्यावतीने तमाशा कलावंतांना जयंत पाटील यांच्याहस्ते जीवनावश्यक किट्स वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब पाटील, विश्वनाथ डांगे, मोहन चव्हाण, प्रा. प्रदीप पाटील, सतीश पाटील, भूषण शहा, प्रा. कृष्णा मंडले उपस्थित होते.