शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दुष्काळाच्या बाबतीत सरकारची पावलं कासवगतीनं : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:36 PM

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच ...

म्हसवड : ‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेण्यात येत होते; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतलाच नाही. हे सरकार दुष्काळाशी लढा देण्यास कमी पडले असून, त्यांची पावले कासवगतीने पडत आहेत,’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला.म्हसवड (ता. माण) येथे बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने तालुक्यातील जनतेची तहान भागवण्यासाठी तीस पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. या टँकरच्या प्रारंभानंतर पवार बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, बारामती अ‍ॅग्रोचे प्रमुख रोहित पवार, संजय शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज पोळ, कविता म्हेत्रे, उपनराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मनोजपोळ, बाळासाहेब सावंत, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, पिंटू तावरे, आदी प्रमुख उपस्थित होते.शरद पवार म्हणाले, ‘आपण दुष्काळाच्या कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा होतोय. तो अधिक व्हावा यासाठी बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून टँकर उपलब्ध करून दिले आहेत. आता दुष्काळी गावांना भेटी दिल्या. त्यावेळी लोकांच्या अनेक तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्यामध्ये जनावरे आणि माणसांना पाणी नाही. रोजगार आणि रेशनवरही धान्य नाही. जनवारांना चारा मिळेना अशी स्थिती आहे. या भागाला दुष्काळ नवीन नाही; पण आताचे संकट मोठे आहे. त्यावेळेचा दुष्काळ आणि आताचा दुष्काळ वेगळा आहे. यातून मार्ग कसा काढायचा, हा प्रश्न आहे.’‘दुष्काळी परिस्थिती आल्यावर आघाडी शासनाच्या काळात आॅगस्टमध्ये निर्णय घेऊन उपाययोजना लगेच सुरू केल्या जात होत्या; परंतु आताच्या सरकारने दुष्काळ गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसून येते. तसेच तालुक्यातील बाधित गावांना किती टँकरची गरज आहे, त्या प्रमाणात टँकरची संख्या नाही. अनेक गावे पाण्यासाठी तहानलेली आहेत. तालुक्यातील पाणी स्रोत संपू लागलेत. पुढील अडीच महिन्यांचा काळ जायचा कसा, पाणी कोठून आणायचे? हा प्रश्न आहेच,’ असेही पवार यांनी सांगितले.दुष्काळाचे राज्यात संकट मोठे आहे. राज्यातील वेगवेगळ्या चांगल्या संस्था, कारखानदारांनी या संकटप्रसंगी दुष्काळग्रस्तांना मदतीचा हातभार लावावा, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.चौकट :पैसे मिळाले नसल्याचे सांगितले...राज्यातील दुष्काळाची पाहणी करून या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला भेटून अजून काय उपाययोजना करणे गरजेचे आहे, हे सांगणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. तर यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना पवार यांनी तुम्ही पीक विमा काढलाय का? तुमची पिके जळाली, नुकसानभरपाई मिळाली का ? असा प्रश्न केला. त्यावर लोकांनी हात वर करून पीक विमा काढूनही पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.असा राहिला माण दौरा...शरद पवार हे रविवारी माण तालुका दौºयावर होते. ते सकाळी बारामतीहून माण तालुक्यात आले. आल्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास बिजवडी येथे ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर शिंदीमध्ये पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून महाश्रमदानाच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर वावरहिरे येथे ग्रामस्थांशी रोजगार, चारा आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भात संवाद साधला. या ठिकाणाहून भालवडी येथील चारा छावणीस भेट देण्यासाठी ते गेले. तेथे पशुपालकांबरोबर चर्चा करून मार्डीतील वाळलेल्या डाळिंंब बागेची पाहणी केली. त्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भोजन केले. यानंतर पवार यांनी पानवण येथे पाणी फाउंडेशनच्या कामाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथून पवार यांचे म्हसवड येथे आगमन झाले. या ठिकाणी बारामती अ‍ॅग्रोच्या वतीने देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा प्रारंभ करत नागरिकांशी संवाद साधला. हा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचनंतर त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले.