अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी जमीन खरेदी करावयाची असल्याने गटाचा गावठाण दाखल मिळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. या वेळी बामणोलीचा ग्रामविकास अधिकारी मलमे याने सहा हजार रूपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने ‘लाचलुचपत’शी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती. बुधवारी ‘लाचलुचपत’च्या पथकाने याची पडताळी केली त्यात लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर पथकाने बामणोली ग्रामपंचायत कार्यालयात सापळा लावला. यावेळी ग्रामविकास अधिकारी मलमे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करत ६ हजार रुपये स्वीकारताना त्यास पकडण्यात आले. मलमे याच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गुरुदत्त मोरे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
कोणत्याही शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्याने लाचेची मागणी करणे चुकीचे आहे. असे प्रकार घडल्यास नागरिकांनी लाच न देता विभागाशी संपर्क साधावा. अथवा १०६४ वर आपली तक्रार द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी केले आहे.