शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

सांगलीत गुरुवारपासून द्राक्ष महोत्सव, शासनासह द्राक्ष बागायतदार संघाचा पुढाकार 

By अशोक डोंबाळे | Published: March 05, 2024 2:00 PM

द्राक्षांबाबत ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम

सांगली : नागरिकांना चांगल्या प्रतीचे द्राक्ष मिळावेत आणि द्राक्ष फळासंबंधी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या प्रमुख हेतून गुरुवार दि. ७ ते शुक्रवार दि. ८ मार्च या कालावधीत सांगलीतील कच्छी जैन भवन येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी द्राक्ष बागायतदार संघ, राज्य शासनाचा कृषी विभाग, रासायनिक खते व कीटकनाशक उत्पादन घेणाऱ्या कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन आणि बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.द्राक्ष महोत्सव तयारीसाठी कृषी विभागात बैठक झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सुरेंद्र पाटील, द्राक्ष संघाचे सचिव तुकाराम शेळके, सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, कृषी निविष्ठा उद्योजक संजीव कोल्हार, दीपक राजमाने, प्रतीक शहा, रवींद्र मुडे, समीर इनामदार, अविनाश माळी, सदाशिव लांडगे, यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.द्राक्ष खाल्ल्याने होणारे आरोग्यासाठीचे फायदे यासंबंधी लोकांमध्ये माहिती पोहोचावी यासाठी राममंदिर चौकातील कच्छी भवनात द्राक्ष महोत्सव होणार आहे. द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने ‘महाशिवरात्र द्राक्ष दिन’ म्हणून देशभरात दरवर्षी साजरा व्हावा आणि या दिवशी प्रत्येक घरोघरी आवडीने द्राक्षे आणि बेदाणे खाल्ले जावेत. ज्यामुळे द्राक्ष फळांची मागणी वाढून दरामध्ये वाढ व्हावी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हा द्राक्ष महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महाशिवरात्रीला द्राक्षे खाल्ली जावीत हा संदेश सर्व देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, असेही रवींद्र मुडे यांनी सांगितले.मागणी देशभरात वाढेलमहाशिवरात्र द्राक्ष दिन संपूर्ण भारतभर भविष्यात साजरा झाला, तर द्राक्ष आणि बेदाणा फळाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे द्राक्ष बागाईतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल व त्यावर अवलंबून असणारे सर्व कृषी संलग्न व्यवसायांना भरभराटीचे दिवस येतील हा उद्देश आहे. ग्राहकांच्या सोबत ‘द्राक्ष महोत्सव’ साजरा करूया यासाठी सर्वांच्या उपस्थितीची व सहकार्याची आवश्यकता आहे, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Sangliसांगली