प्रवीण जगताप - लिंगनूर-स्थानिक आणि शहरातील बाजारपेठेत विक्री होणाऱ्या द्राक्षांची काढणी मिरज पूर्व भागात महिन्याभरापासून वेगात सुरू आहे. मात्र जानेवारीच्या आरंभास झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत. काही बागांतील द्राक्षांच्या दर्जावर परिणाम झाला आहे, हे खरे असले तरी, कमी दराने द्राक्षे घालविण्यापेक्षा अशा बागायतदारांनी अचानक बेदाणा निर्मितीचा निंर्णय घेतला आहे. मिरज पूर्व भागात आॅगस्टपासून आॅक्टोबरपर्यंत फळछाटण्या घेतल्या जातात. आॅगस्ट ते सप्टेंबर महिन्यातील द्राक्षे बाजारपेठेत पाठवली जातात. मात्र यंदा सप्टेंबर छाटणीतील द्राक्षबागांना डिसेंबर व जानेवारीत पडलेल्या पावसामुळे फटका बसला. अनेक बागांतील द्राक्षांचा दर्जा घसरला, द्राक्षांत कूज-बुरशी सुरू झाली. काहींच्या द्राक्षांची चकाकी कमी होऊन बुरशीजन्य रोगांचे आक्रमण झाले. पूर्ण घडच बाद होण्याची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे अशा द्राक्षांना परप्रांतातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठांसाठी दर पाडण्याचे धोरण सुरू केले. त्यामुळे आधीच औषधांच्या खर्चाने वैतागलेल्या द्राक्ष बागायतदारांनी पडलेले दर स्वीकारण्यापेक्षा बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला आहे.
द्राक्ष उत्पादकांचा कल बेदाण्याकडे
By admin | Published: January 21, 2015 10:00 PM