लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन सांगलीत पक्ष्यांना चारा व पाणी मिळावे, या हेतूने ‘एक घास चिऊताईसाठी’ या उपक्रमांतर्गत अवनी फाऊंडेशनने पत्र्याचे डबे तयार केले आहेत.
संस्थापक-अध्यक्ष दिलीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम सुरू आहे. जाधव म्हणाले की, चित्रकला स्पर्धा, शालेय वस्तूंचे वाटप, मुक्या जनावरांसाठी पाणपोई, रक्तदान शिबिर, वृक्षारोपणासह कोरोनामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना सलग एक्कावन्न दिवस नाष्टा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा व चाऱ्याचा तुटवडा जाणवत असतो. त्यासाठी डबे तयार केले आहेत. सांगली-मिरज-कुपवाडमधील वेगवेगळ्या उद्यानांमध्ये असे डबे तयार करून लावण्यात येणार आहेत.
उपाध्यक्ष अभिजित तवटे, सचिव कपिल चव्हाण, कपिल वराळे, संदीप पाटील, संतोष कलकुटगी, महेश वडर, अमोल डांगे, सचिन शहा, आनंद लेंगरे यांचा यात सहभाग आहे.