ओळ : नेलेॅ (ता. वाळवा) येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रा. साधना पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच छायाताई रोकडे उपस्थित हाेत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : स्त्री शक्ती ही महत्त्वाची असून, तिच्यामध्ये संयमाची फार मोठी ताकद असते. नवनिर्माणाची ताकद फक्त महिलांमध्येच असते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपण प्रभावीपणे करूया, असे प्रतिपादन प्रा. साधना पाटील यांनी केले.
नेलेॅ (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला दिन समारंभाच्या प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच छायाताई रोकडे या होत्या.
ग्राम विकास अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी स्वागत केले. सरपंच छायाताई रोकडे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या नीलम कुंभार यांचाही यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंगल भुसारी यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सदस्य सविता माने, शरावती पाटील, मनीषा जंगम, पद्मा भाकरे, कृष्णाजी माने, बाळासाहेब रोकडे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आदी उपस्थित होते.