इस्लामपूर : इस्लामपूर येथील दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी संचालक उमेश गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
गावडे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जीवनात जे गुण, शक्ती भावना आणि जीवनमूल्यांचा विकास करून एक अमीट छाप तत्कालीन लोकजीवनावर उमटवली होती. त्या सर्वांच्या उपासनेची जितकी आवश्यकता त्यांना त्यांच्या जीवनकालात होती, त्याहून कितीतरी पटीने आजच्या युगात आपणा सर्वांसमोर उभी आहे. अहिल्यादेवींच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून आजच्या तरुण पिढीने सतत कार्यरत राहिले पाहिजे.
यावेळी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र लोंढे, सरव्यवस्थापक विनोद देशमुख, वित्त व्यवस्थापक आर. एस. मिरजे, सूर्यकांत देसाई, एस. आय. मेत्री, एच. आर. पाटील, श्रीहरी कुंभार, जावेद पठाण, डी. एस. पाटील, अदित्य यादव, आनंदराव मिठारी, विजय पाटील, अभिजीत बारपटे, अर्जुन सावंत, संग्राम पाटील, राजेंद्र खोत उपस्थित होते.
बजरंग कदम यांनी स्वागत केले. प्रशांत जाधव, नामदेव कोळेकर, विजय कवठेकर यांनी संयोजन केले.
फोटो : ०६ इस्लामपुर ३
ओळ : इस्लामपूर येथे दीनदयाळ सूतगिरणीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उमेश गावडे, विनोद देशमुख, आर. एस. मिरजे, बजरंग कदम, सूर्यकांत देसाई उपस्थित होते.